उंटावरच्या शहाण्यांकडून म्हणजे मूर्ख माणसांकडून असेच सल्ले मिळतात

एका सावकाराच्या वाड्यात खूप मोठा जनावरांचा गोठा होता. गाई, म्हशी, वासरं तेथे सदैव बांधलेली असत. त्यातील एका वासराला अतिशय तहान लागली होती. पाण्याशिवाय त्याचा जीव अगदी कासावीस झाला. शेवटी आसपास कुठे पाणी मिळते का हे पहाण्यासाठी त्याने आपल्या गळ्याला बांधलेली दोरी तोडली आणि ते पाण्याच्या शोधासाठी हिडू लागले. एका भितीजवळ एक लहानसे मडके होते. त्याच्या तळाला थोडेसे पाणी त्या वासराला दिसले. तहानलेल्या वासराने पाणी पिण्यासाठी त्या मडक्यात तोंड घातले आणि त्या मडक्यात त्याचे तोंड अडकले. काही केल्या डोके बाहेर काढता येईना. तेव्हा सावकाराच्या माणसांनी एका व्यत्रि*ला सल्ला देण्यासाठी बोलावून आणले. तो उंटावर बसून आला आणि म्हणाला, ”वासराचे डोके कसे काढायचे हे पाहाण्यासाठी मला वासराजवळ जावे लागेल पण मी उंटावरूनच तेथे जाईन. त्यासाठी तुम्हाला घराची भित पाडावी लागेल.” त्याचे ऐकून सावकाराच्या नोकराने भित पाडून त्याची आत जाण्याची सोय केली. त्यानंतर हा शहाणा गोठ्याजवळ गेला. वासरू डोके काढण्यासाठी खूप धडपड करत होते. ते पाहून म्हणाला, ”आधी वासराची मान कापा म्हणजे मडक्यात त्याचे डोके सुरक्षित राहील आणि त्यानंतर मडके फोडा म्हणजे कापलेले असले तरी डोके शाबूत राहील. बघा कसा प्रश्न सोडवला !”
तात्पर्य – उंटावरच्या शहाण्यांकडून म्हणजे मूर्ख माणसांकडून असेच सल्ले मिळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.