चंद्रकांत वर्तक (लूयू-चीन)

आणखी एकदा पुनर्बांधणी झाली-तोच आजचा, युवान ष्वांग पॅगोडा! आजही त्याची उंची दोनशे फूट आहे ! हा इतिहास मी ऐकला आणि मी अगदी सुन्न झालो. त्या युवान ष्वांग पॅगोड्याकडे पुन्हा पुन्हा पाहू लागलो. प्रथम सुन्न, संभ्रमित अवस्थेत-नंतर मन स्थिरावल्यावर नीटपणे ! माझ्या मनात आले की माणसाप्रमाणे निर्जीव गोष्टींना-वास्तू, मंदिरे इ. ना-जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, पुनमृत्यू ह्या फेर्‍यातून जावे लागत असले पाहिजे. त्यांच्याभोवतीही नियतीचे फेरे पडत असले पाहिजेत. युवान ष्वांग हा खरे म्हणजे सात्त्विकतेचा पुतळाच होता-त्याच्यासाठी बांधलेल्या ह्या पॅगोड्याला त्याच्या सात्त्विकतेचा भरभक्कम आधार होता पण त्याचेही भवितव्य असे गोते खाणारे ठरले.

— चंद्रकांत वर्तक (लूयू-चीन)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.