गर्व आणि अहंकाराची चादर जोपर्यंत मनातून दूर करत नाही तोपर्यंत साक्षात्कार कसा होईल ?

रामकृष्ण परमहंस यांचे अनेक शिष्य होते. परमहंस हे अनेकवेळा अध्यात्मिक मार्गातील आपले अनुभव शिष्यांना सांगत असत. जेणेकरून या मार्गावरून जातांना शिष्यांना प्रगती करणे सोपे जावे. अतिशय साधी सोपी उदाहरणं देऊन तत्त्वज्ञान ते सहजपणे उलगडून सांगत. एकदा प्रवचन देतांना ते म्हणाले, ‘‘आता मी तुमच्यासमोर बसलो आहे. तुम्ही समोरासमोर प्रत्यक्ष मला पाहत आहात. पण एखादी चादर तुमच्या माझ्यामधे धरली तर मी तुम्हाला दिसणार नाही. मी पूर्वी ज्या जागेवर होतो तेथेच आत्ताही आहे. परंतु ही चादर मधे आल्यामुळे मी तुमच्या दृष्टीस पडत नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने माझं इथे अस्तित्व नाही कारण मी तुम्हाला दिसत नाही. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या माझ्या आसपास, जवळ असतो. पण आपण स्वतः ‘मी’ च्या गर्वाने फुलून गेल्यामुळे, अहंकाराच्या धरलेल्या चादरीमुळे आपणाला परमेश्वर दिसू शकत नाही. इतकंच काय छोटासा कापडाचा तुकडा जरी डोळ्यापुढं धरला तरी आजूबाजूचे काहीच दिसत नाही. ःः
तात्पर्य – गर्व आणि अहंकाराची चादर जोपर्यंत मनातून दूर करत नाही तोपर्यंत साक्षात्कार कसा होईल ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.