गरुडाच्या पंखांचा बाण

गरुड पक्षी एका उंच कड्यावर ससा टेहळीत असता, एका पारध्याने त्याला पाहिले व अचूक नेम धरून बाण सोडला. तो बाण गरुडाच्या छातीला लागून तो अगदी मरायला टेकला. मरता मरता शरीरात घुसलेल्या बाणाकडे त्याने पाहिले तो त्या बाणांचा पिसारा गरुडाची पिसे लावून केला होता असे त्याला दिसले. तेव्हा तो म्हणाला, ‘माझ्या पंखातल्या पिसाने ज्याचा पिसारा सज्ज झाला, अशा बाणाने मी मरावं, याचंच मला जास्त वाईट वाटतं.’

तात्पर्य – आपल्यावर आलेले संकट आपल्याच लोकांच्या मदतीने निर्माण झालेले पाहून, त्याबद्दल जास्त दुःख होते.