अनिल काकोडकर (कर्मयोगी शास्त्रज्ञ)

आमच्या वर्गातील काही मुलांनी आम्हाला गणित शिकविणार्या शिक्षकांकडे शिकवणी लावली होती. त्या काळी अशी शिकवणी लावण्याची प्रथा नव्हती. परंतु आपल्या काही मित्रांनी ज्या अर्थी शिकवणी लावली, त्या अर्थी ती काही तरी महत्त्वाची बाब असावी व आपणही त्याबाबत मागे राहून चालणार नाही, असा माझा समज झाला. म्हणून मी त्या शिक्षकांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो, ‘‘मला तुमची ट्युशन लावायची आहे.’’ त्यांनी माझ्याकडे चमकून पाहिले आणि प्रश्न केला, तुला ट्यशन कशाला हवी ? त्यावर मी त्यांना सांगितले की, माझ्या काही मित्रांनी तुमच्याकडे ट्युशन लावली हे मला कळले आहे. म्हणून मलाही ती लावाविशी वाटते. तेव्हा ते माझ्यावर भडकले आणि म्हणाले, तुझ्यासारख्या बुद्धिवान मुलाला ट्युशनची आवश्यकता नाही. ज्यांची बुद्धिमत्ता कमी असते, जी एकपाठी नसतात, स्मरणशत्त*ीत कच्ची असतात, ज्यांचा अभ्यास प्रयत्न करूनही होत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ट्युशन लावणे योग्य ठरते.

— अनिल काकोडकर (कर्मयोगी शास्त्रज्ञ)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.