अति तेथे माती

एक अतिशय गरीब शेतकरी होता. दिवसरात्र तो आपल्या शेतात काबाडकष्ट करीत असे तरी त्याला त्या शेतातून त्याचा संसार चालेल इतकेही पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. दारिद्रयाला कंटाळून तो देवाची विनवणी करीत असे. एकदा त्याला आपल्या शेतात एक भले मोठे वारूळ दिसले. त्या वारूळात मुंग्या आणि नाग दोघंही राहत होती. परंतु इतक्या दिवसात त्या वारूळातील नागाचे त्याला कधीही दर्शन झाले नव्हते पण आज मात्र त्या नागाचे दर्शन होताच त्याने त्याला नमस्कार केला आणि आजपर्यंत आपण या नागदेवतेकडे दुर्लक्ष केलं असा मनात विचार करून त्याने त्या वारूळाबाहेरचा परिसर झाडून स्वच्छ करून, शेणाने सारवला. त्या वारूळाची रोज पूजा करून नागदेवतेला तो नैवेद्य दाखवू लागला. वारूळातील मुंग्या आणि तो नाग रोज नैवेद्य खाऊ लागले. एकदा तो पूजा करीत असताना नाग वारूळातून बाहेर आला. शेतकर्याने त्याला हात जोडून नमस्कार केला. त्यावेळेस नागाने त्याच्या हातावर एक सोन्याची मोहोर ठेवली. मग नाग त्या शेतकर्याला दररोज एक मोहोर आणून देत होता. त्या मोहोरा घेऊन शेतकरी आपल्या गरजा भागवत असे. एकदा शेतकरी गावाला गेला. जाताना त्याने मुलाला पूजा आणि नैवेद्य दाखविण्यास सांगितले. दुसर्या दिवशी नागाने मुलालाही सोन्याची मोहोर दिली. ते पाहून वारूळात खूप सोन्याच्या मुद्रा असाव्यात असे वाटून त्याने वारूळ खोदून काढले. त्याला तिथे एकही मोहोर सापडली नाही. मात्र चिडलेल्या नागाने त्याला दंश केला. ::
तात्पर्य – अति तेथे माती.

39 Comments on अति तेथे माती

  1. Very much helpful. Thanks a lot. I didn’t know how to write the story on this topic but it helped me very much. Great!

Leave a Reply

Your email address will not be published.