अरुण साधू (ग्लानिर्भवति भारत…)

;;क्षणभर जयसिगराव देसाई स्वतःबद्दलही संभ्रमित झाले. इतिहासाच्या प्रवाहाचा वेग एवढा जबरदस्त असला म्हणून काय झाले ? आपणही हतबलपणे प्रवाहाला शरण जायचे ? आपल्यात बळ नाही. इच्छाशक्ती नाही. क्षमता नाही. या मुलामध्ये तरी कुठे आहे बळ ? प्रवाहाच्या बाहेर पडून भविष्याची वेगळी वाट शोधणार्‍या सुप्त शक्ती अजून शिल्लक आहेतच. त्या कधीतरी जाग्या होऊन आक्राळ-विक्राळ रूप धारण करून या प्रवाहाची दिशा बदलतील याबद्दलही शंका नाही. पण त्या जाग्या केव्हा होणार ?

— अरुण साधू (ग्लानिर्भवति भारत…)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.