ते आभाळ भीष्माचं होतं.

पितामह भीष्म: व्यक्तिमत्त्व, व्रत आणि महाकाव्यात्मक संघर्ष महाभारतातील एक अत्यंत गूढ, महान आणि तरीही वेदनांनी भरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे पितामह भीष्माचार्य. मराठी वाङ्मयात प्रथमच भीष्माचार्यांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा इतका मूलगामी, मर्मग्राही आणि व्यापक वेध घेणारी महा-कादंबरी – ‘ते आभाळ भीष्माचं होतं…!’ या अद्वितीय साहित्यकृतीच्या निमित्ताने Marathisrushti Talks – Episode 16 मध्ये आमच्यासोबत आहेत प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते आणि कादंबरीकार अशोक समेळ. या संवादात आपण जाणून घेणार आहोत – • भीष्माचार्यांचा मानवी संघर्ष आणि अंतर्मन • व्रतस्थ जीवनाचा अर्थ आणि त्याची किंमत • भीष्म हे केवळ योद्धा नव्हे, तर एक तत्त्वचिंतन • या महा-कादंबरीची संकल्पना, संशोधन आणि लेखनप्रवास ही केवळ कादंबरी नसून, भीष्माच्या आभाळात डोकावण्याचा एक गंभीर, सखोल आणि विचारप्रवर्तक प्रयत्न आहे.

Host: Dhanashree Pradhan Damle

0:00 – Highlights
1:50 – Marathisrusthi Talks Logo
1:53 – Disclaimer
2:02 – Introduction
5:28 – सप्त चिरंजीवांपैकी ६ चिरंजीव शापित नाहीत, अश्वत्थामा शापित असल्यामुळे आजही दिसतो का?
8:28 – महाभारत झाल्याचे संदर्भ कुठे-कुठे आढळतात?
10:34 – क. वि. वर्तक यांचा कादंबरीतील संदर्भ
13:07 – ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ ही कादंबरी कशी लिहिली गेली?
16:22 – भीष्मांचा आधीचा जन्म आणि आठ वसू म्हणजे काय?
27:35 – पांडव-कौरवांनी भीष्मांना ‘पितामह’ ही पदवी का दिली?
29:00 – भीष्मांमधील सर्वात महत्त्वाचे गुण कोणते?
35:29 – कादंबरीतील दक्षिणायन व उत्तरायण यांचा अर्थ
38:59 – अश्वत्थामा आणि ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ — युद्धप्रवासाचा वेगळा दृष्टिकोन
42:56 – भीष्म विद्वान असूनही कुरुवंशाचा संघर्ष / महाभारत का थांबवू शकले नाहीत?
47:12 – भीष्मांनी काही निर्णय वेगळे घेतले असते तर इतिहास बदलला असता का?
52:49 – भीष्मां-कडील अस्त्रविद्या कोणाकडे सुपूर्त केली?
1:05:05 – End

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*