आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो? प्रत्येक वेळी आजार झाल्यावर वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आपल्या आरोग्याचा संपूर्ण इतिहास जाणणारा एक फॅमिली डॉक्टर असणं किती महत्त्वाचं आहे?
Marathisrushti Talks च्या या विशेष भागात, सूत्रसंचालक धनश्री प्रधान दामले यांनी संवाद साधला आहे डॉ. श्रुती श्रीधर यांच्याशी. त्या एक जनरल फिजिशियन (MBBS) असून, त्यांना दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन आणि पुराव्यांवर आधारित एकात्मिक उपचारपद्धतींमध्ये विशेष रुची आहे.
डॉ. श्रुती श्रीधर या डायबिटीज मॅनेजमेंट, वजन कमी करणे, दीर्घकालीन वेदनांचे व्यवस्थापन आणि पॅलिएटिव्ह केअर यामध्ये प्रमाणित आहेत. तसेच, दीर्घकालीन आजारांसाठी त्या आहारविषयक मार्गदर्शनही करतात. त्या त्यांच्या ‘Return of the Family Physician’ या पुस्तकातून फॅमिली डॉक्टर या संकल्पनेचं महत्त्व अधोरेखित करतात.

Leave a Reply