Voice To Text

मराठीत टाईप तर करायचंय… पण टायपिंगचा कंटाळा येतो? मराठी टायपिंग कठीण वाटतं ? तर मग आता अजिबात चिंता करु नका….

आता फक्त बोला… आणि आपण बोललेलं सगळं इथे  आपोआप टाईप होईल..

आपल्या आवाजात बोलून सरळपणे आणि सोपेपणाने मराठीत टाईप करायची सोय आता मराठीसृष्टीवर उपलब्ध केलेली आहे.  ही सोय वापरुन आता आपण आपले लेख अधिक जलदपणे लिहू शकाल.   खरतर हे गाईड सुद्धा असच बोलून टाईप केलेलं आहे.

(ही सुविधा मराठीसृष्टीच्या `प्रिमिअम सभासदांसाठी’ सुरु केलेली आहे. मात्र सुरुवातीचे काही दिवस आमच्या सर्व लेखकांसाठी ही सेवा देण्यात येत आहे. आपण प्रिमिअम सभासद झाले नसल्यास आत्ताच होऊ शकता. प्रिमिअम सभासदत्त्वाचे अनेक फायदे आहेत. याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा  )

आपण लॉग इन केल्यानंतर  सर्वप्रथम डॅशबोर्डवर याल.  येथे डाव्या बाजूला आपल्याला Menu दिसेल. यामध्ये आर्टिकल्स या लिंकवर क्लिक केल्यास आपले सर्व लेखन तिथे दिसेल.  नवीन लेख सुरू करण्यासाठी Add New Article या लिंक वर क्लिक करा.

येथे आपल्याला  खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे एक एडिटर दिसेल.

आपण MS Word वगैरेसारख्या  एडिटरशी परिचित असालच. त्यामुळे हा एडिटर वापरणे आपल्याला कठीण जाणार नाही.  मात्र इतर एडिटर्स आणि हा एडिटर यात एक अतिशय महत्त्वाचा फरक आहे.  तो म्हणजे या एडिटरमध्ये आपण चक्क बोलून आपल्याला हवे ते टाईप करू शकता.   त्याचप्रमाणे  वेगवेगळे कीबोर्ड वापरून टाईप झालेला मजकूर दुरुस्तही करू शकता. येथे आपण आपल्या नेहमीच्या परिचयाचे fontfreedom इंग्लिश फोनेटिक,  गमभन,  इन्स्क्रिप्ट  हे कीबोर्ड वापरू शकता.  आपल्याला गुगलच्या कीबोर्डची सवय असल्यास तो सुद्धा आपण येथे वापरू शकता.

ह्या एडिटरमध्ये आपल्याला दोन वेगळे मेनू बँड दिसतील. यातील एक  कीबोर्डसचा आहे  तर दुसरा आपला मजकूर सेव्ह करण्यासाठी चे वेगवेगळे ऑप्शन्स देणारा आहे.

कीबोर्ड Options Save Options

आता आपण मराठीमध्ये बोलून आपल्याला हवा असलेला मजकूर टाइप करण्यासाठी सज्ज आहात.  सर्वप्रथम आपल्याला आपल्या पसंतीचा कीबोर्ड निवडायचा आहे.  वर दाखवलेल्या कीबोर्ड ऑप्शन्स पैकी  कोणताही एक आपण निवडू शकता.  font freedom इंग्लिश फोनेटिक  आणि गमभन हे कीबोर्ड आपल्या परिचयाचे आहेतच.  याशिवाय बरेचजण  इन्स्क्रिप्ट कीबोर्ड सुद्धा वापरतात.  अनेक जण गुगलच्या कीबोर्ड ला सुद्धा सरावलेले आहेत.  आपण यातील कोणताही वापरू शकता. खाली दाखवलेल्या बटणावर क्लिक करुन आपण कीबोर्ड निवडू शकता.

हा आपल्या परिचयाचा गमभन कीबोर्ड.  आपण जसे इंग्रजीत स्पेलिंग लिहिता तसेच इथे लिहिल्यावर ते शब्द मराठीत  येतात. हा आहे फॉन्टफ्रिडमचा इंग्लिश फोनेटिक कीबोर्ड.  आपण जसं इंग्रजीत बोलतो तसंच इकडे टाईप करायचं.
संगणकाच्या सुरुवातीच्या काळाला बरेच लोक इन्स्क्रिप्ट कीबोर्ड वापरत असत.
त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी हा सुद्धा येथे दिला आहे
आपण जर गुगल टायपिंगला सरावलेले असतात किंवा इतर कोणताही वापरत असाल तर इथे इंग्लिश कीबोर्ड सिलेक्ट करा.

 

कीबोर्डस च्या बाजूला आयकॉन आहे व्हॉइस टायपिंगचा. ह्याच्या वर क्लिक केल्यास माईक सुरू होतो.  काहीवेळा आपल्याला माईक  वापरायला ब्राउझरला परवानगी द्यावी लागते.  यासाठी Allow या बटणावर क्लिक करा.   आता तो माईकचा आयकॉन फ्लॅश व्हायला सुरुवात होईल.

आता आपला कर्सर  एडिटरमध्ये आणा.  आणि बोलायला सुरुवात करा.  आपण बोललेला शब्दसमूह किंवा वाक्य वरच्या एका विंडो मध्ये टाईप होताना दिसेल.  आपण बोलण्यामध्ये मोठा पॉझ घेतल्यास,  किंवा फार जलदपणे बोलल्यास कदाचित त्यात काही चुका होण्याची शक्यता आहे.  काही शब्द कदाचित टाईप होणार नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीने टाईप होतील.  ते बदलण्यासाठी येथेच आपण  आपल्याला हवा तो कीबोर्ड वापरू  शकता.  म्हणजेच टायपिंग आणि कीबोर्डवरून टायपिंग  या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी मिळतील.

येथे एक अतिशय महत्त्वाची सुचना आहे ती म्हणजे  आपण चांगल्या प्रतीचा माइक वापरायला हवा.  लॅपटॉपच्या इनबिल्ट माइक ऐवजी एक्सटर्नल माइक वापरल्यास उत्तम.  त्याचप्रमाणे आपले उच्चार अतिशय स्पष्ट असले पाहिजेत.   एखादा शब्द चुकला तर तो कीबोर्ड वापरून सुधारता येऊ शकतो.  किंवा त्या शब्दाला सिलेक्ट करून आणि डिलीट करून माइक मध्ये पुन्हा तो शब्द उच्चारून टाईप करता येऊ शकतो.

आपला लेख लिहून झाल्यावर आपण येथे  तो संग्रहित करू शकता.  त्याचप्रमाणे वर्ड,  text  किंवा pdf फाईलच्या स्वरूपातही तो आपल्या संगणकावर डाऊनलोड करून ठेवू शकता.  आपण केलेले लेखन थेटपणे व्हॉट्सॲप किंवा जीमेल च्या माध्यमातून इतरांना पाठवू सुद्धा शकता.  फेसबुकवर किंवा आपल्या ब्लॉगवर तसेच सोशल मीडियावर सुद्धा ते इतरांपर्यंत शेअर करू शकता.

लेख अर्धवट लिहून झाला असेल तर तो draft म्हणून सेव्ह करू शकता आणि पुन्हा लेखन सुरू करायचे झाल्यास लेखांच्या सूचीतून हवा तो लेख निवडू शकता.

ही सुविधा नव्यानेच सुरू केलेली आहे.  या सुविधेसाठी आम्ही व्हॉईस मॉड्युल वापरले आहे.  त्यात वेळोवेळी सुधारणा होत आहेत.   जसजशा सुधारणा होत  जातील तसा आपल्याला येथे येणारा अनुभव जास्त चांगला येऊ लागेल. जे शब्द टाइप होणार नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीने टाइप होतील ते कुठेतरी सेव्ह करून ठेवा आणि आम्हाला कळवा.

काम करत असताना व्हॉइस टायपिंग बंद करायचे असल्यास माईकच्या आयकॉन वर पुन्हा एकदा क्लिक करा म्हणजे तो फ्लॅश होण्याचा थांबेल.

मराठीसृष्टीवर ही सोय प्राथमिक स्वरूपात दिलेली आहे.  आपल्याला व्यावसायिक स्वरूपात आपले लेख लिहून संग्रहित करायचे असल्यास आपण आमची विशेष सेवा त्यासाठी वापरू शकाल.  या सेवेचे अनेक फायदे आहेत.  जसे की,  आपण बोलून टाईप केलेले लेख आपण सेव्ह करू शकता.  प्रिंट करू शकता.  त्याची पीडीएफ फाईल बनवू शकता.  मजकूर थेट जी मेल द्वारे कोणालाही पाठवू शकता.  अगदी व्हॉट्सॲपने सुद्धा  आपला मजकूर पाठवू शकता.  तेथे आपल्याला आपले लेख साठवून ठेवण्यासाठी इंटरनेटवरील जागासुद्धा देण्यात येते.  त्याचबरोबर इतर अनेक सोयी-सुविधा तेथे उपलब्ध आहेत.

फॉन्टफ्रिडम गमभन हे सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांना ती किती सोपे आहे ते माहीतच आहे.  आता त्याची फॉन्टफ्रिडम गमभन २०१८  voice pro  या नावाने ही संपूर्णपणे नवीन आवृत्ती बाजारात आलेली आहे.   या आवृत्तीमध्ये नेहमीसारखे कीबोर्ड वापरून टायपिंग आणि व्हॉइस टायपिंग या दोन्हीचा समावेश  करण्यात आला आहे.