j-2855

”तुम्ही मंगळवार पेठेत रहाता ?”
”नाही.”
”तुमचे नाव वसंत पेठकर आहे ?”
”नाही.”
”तुम्ही कार्पोरेशनमध्ये नोकरी करता ? ”
”नाही.”
“माझे नाव वसंत पेठकर आहे. मी कार्पोरेशन मध्ये नोकरी करतो आणि मी मंगळवार पेठेत रहातो. हे सर्व तुमच्या हातातल्या छत्रीवर लिहिले आहे. ती छत्री मला द्या.”