J-023

हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली, “ए वेटर, हे बघ, या वरणात बटन निघाले.” वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला. तो माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला, “अरे, हे काय करतो आहेस ?”
त्यावर तो वेटर म्हणाला “या बटनाबरोबर सुई-दोराही होता, तो शोधतोय !”