Avatar
About सुभाष नाईक
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

आली झड आली झड

आली झड आली झड . काळ्याशार ढगांची झुंड ओततेय् घागरीमागून घागर . तरी भरेना धरतीचं tub जरी बुडलं आगर – सुभाष नाईक

हायकू – डॉक्टरची वेटिंग-रूम

हायकू डॉक्टरची वेटिंग-रूम सर्टिफिकिटं हारीनं टांगलेली पेशंटस् ची गर्दी, चहूंकडे पांगलेली ( हारीनं : रांगेनें ) – सुभाष स. नाईक

घों घों वारा

घों घों वारा पावसाचा मारा हिरवं हिरवं वन गरीब माणसांचं मात्र मरण – सुभाष नाईक

लहान-लहान-कवितांच्या कड्या

तशाच, अगदी तशाच, या लहान-लहान-कवितांच्या कड्या. वाचेवाचेतो, कळायच्या आधीच, त्या जातात सरून, पहातां-पहातां, चुटपुट लावून – सुभाष नाईक 

उंदीर, माकडं, पक्षी, टोळ

उंदीर, माकडं, पक्षी, टोळ, गुरं-ढोरं, भुरटे चोर, हे सर्व कमी पडतात, म्हणून की काय, साहेब-बाबू-पाटकरी मोंढ्यावरले व्यापारी शेतकर्‍याच्या पिकावर घालतात धाड त्यांच्यापुढे त्याचा काय पाड ! ते सगळे सुटलेले असतात मोकाट, अन् याचं तर संपलेलं […]

लहानसा वावराचा तुकडा

शेतकर्‍याकडे असतो लहाऽनसा वावराचा तुकडा एक घास खाईतो, कळायच्या आधीच, चावतां-चावतां, त्याचं साऽरं अन्नधान्य जातं संपूऽन – सुभाष नाईक 

पिकतं तिथं विकत नाहीं

‘पिकतं तिथं विकत नाहीं’, असं म्हणतात. पण, लहरी निसर्गामुळे शेतकर्‍याच्या मळ्यात कांहीं पिकतऽच नाहीं मग तो विकणार काय, दगडं ? – सुभाष नाईक 

खरा फायदा लीडरचा

करूं नको देवाचा धावा कर धावा तू नेत्यांचा कर्ज, व्याजही माफ कराया खरा फायदा लीडरचा – सुभाष नाईक 

देवहि गरिबाला छळतो

सारी खोपी गेली झोपी कास्तकार, पण, तळमळतो पीक नाशतां, कर्ज ग्रासतां देवहि गरिबाला छळतो – सुभाष नाईक 

इरिगेशनचे ‘रावसाहेब’

इरिगेशनचे ‘रावसाहेब’ इरिगेशनचे पाटकरी देवच ते ; जरि वारकरी मी कां जावें पंढरपुरी ? – सुभाष नाईक 

1 6 7 8 9 10