Avatar
About सुभाष नाईक
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

आले कां पत्रकार कोणी ?

आले कां पत्रकार कोणी ? आले कां रे कॅमेरे ? शेतकर्‍याचे पुसतो आंसू झटपट घ्या व्हीडिओ ‘खरे’. – सुभाष नाईक 

नेतेगणहो, तुम्ही ठेवा

नेतेगणहो, तुम्ही ठेवा तुमच्या स्कीम्या तुम्हांनजिक शेतकर्‍याला, तुमची ‘सेवा’ तापदायकच ठरे खचित. – सुभाष नाईक 

भाकरीला कधी न लोणी

भाकरीला कधी न लोणी लावा डोळ्यातलं पाणी गुपचुप ओली करून खावा अन् आनंदात र्‍हावा . – सुभाष नाईक

भलाथोरला पाऊस

भलाथोरला पाऊस भलीमोठी नासधूस नको ‘पेपरां’ची चूष गपगार, डोळे पूस. – सुभाष नाईक

बियाणं हायब्रीड आहे

बियाणं हायब्रीड आहे त्याचं हाय् यील्ड् आहे शेतकर्‍याला असो, नसो व्यापार्‍यांना त्याची नीड् आहे – सुभाष नाईक 

कर्जाचा उंचउंच डोंगर

कर्जाचा उंचउंच डोंगर अन् व्याजाचे तीक्ष्ण कडे बँकेची खडबडीत नोटिस, संचित हें कृषिवलाकडे. – सुभाष नाईक 

बलरामाच्या हातीं नांगर

बलरामाच्या हातीं नांगर श्रीकृष्णाच्या हातीं चाक शेतकर्‍याच्या हातीं दोन्ही तरि त्याला सर्वांचा धाक – सुभाष नाईक 

1 8 9 10