दि. बा. मोकाशी (पालखी)

हडपसरला पालखी गाठावी म्हणून मी पुण्याच्या एस. टी. स्टँडवर गेलो. वारकर्‍यांनी स्टँड इतका भरला होता, की दर पंधरा मिनिटांनी त्यातले काही उचलून घेऊन पळणारी एस. टी. ची गाडी कोठरातला एकेक दाणा उचलून पळणार्‍या चिमणीसारखी वाटत होती. हताश होऊन मी हे पाहत उभा असता एक म्हातारी वारकरी बाई माझ्याजवळ आली. माझ्यापुढं एक तिकीट करून म्हणाली, ‘रिझर्वेशन तिकीट आहे लोणंदचं. माणसं आली नाहीत.’’ मी झटकन तिकीट घेऊन गाडीशी धावलो. तिथं उभा असता एकाला सहज तिकीट दाखवलं. तिकिटाकडे पाहून तो म्हणाला, ‘‘अहो ! हे तर कालचं तिकीट आहे.’’ आसपास पाहिलं. म्हातारीचा पत्ता नव्हता. मग तेच तिकीट पुढं करून मोटारीत शिरलो. पुढच्या जागांकडे जात असता पाहिलं तर तीच म्हातारी पुढच्या जागेवर आरामात बसलेली दिसली. तोच वळून माझ्याकडे पाहत, ‘कसं बनवलं ?’ अशा आविर्भावात ती हसू लागली. मी ही हसू लागलो.

— दि. बा. मोकाशी (पालखी)