बाबुराव बागूल (जेव्हा मी जात चोरली होती !)

सूर्याच्या स्नेहाने सुंदर झालेली संध्याकाळ सूर्य पश्चिमेच्या पलिकडे जाताच काळवंडू लागली होती. अशा या उदास वेळी रामराव देशमुखांचे शव सरणावर जळत होते. चिताग्नीने त्यांचे डोके दाढेखाली दाबताच आवाज झाला, तसा त्यांच्या जवळकीच्या माणसांनी आकांत केला; नि त्यांच्या पुत्राने-देवरामाने-आपला उघडाबंब कातीव पोलादी देह गरकन फिरवून सरणाकडे स्नायूने भरलेली डकासारखी कठीण पाठ केली. सुतकीसमान जबरदस्त मूठ आवळून त्वेषाने वार्‍यावर हाणली. दात कराकरा खात तो पुटपुटला- ‘‘बाने तुला…!’’ आणि वाघाप्रमाणे क्रूर कठोर नवर्‍याचा हा विचित्र शोकावेग पाहून देवरामाची बायको कमळा मोठमोठ्याने रडू लागली.

— बाबुराव बागूल (जेव्हा मी जात चोरली होती !)