केशव कुमार (झेंडूचीं फुलें)

मदीय कनिष्ठसहोदरसदृश कविसुहृद् श्री. केशवकुमार यांच्या सन्मान्य, प्रसादोत्कट व आदरयुक्त विनंतिपूर्वक प्रांजळ आग्रहावरून, यांच्या या सहजरम्य, अव्याजमनोहर व सुश्लष्टशब्दावगुंठित मौत्ति*कप्रवाळमिश्रित ‘सुवर्णगुटिके’ समान अल्पमोली व बहुगुणी औषधाप्रमाणे किवा ‘त्वरित दान महापुण्य’ अशा शीघ्रहितसाधक पुण्याचरणाप्रमाणे असलेल्या या आनंद व उत्साहवर्धक लहघुखंडकाव्यास अत्यंत साकल्याने व विस्तारपूर्वक माझ्या पूर्वसांप्रदायास अनुसरून प्रदीर्घ प्रस्तावना न लिहिता, हे काव्य-जरी यांचे नाव चमत्कारिक, मोघम व क्षणिशक्ति असले तरी ते वृत्तवैचित्र्यपूर्ण, पथ्यकारक, सात्त्विक इर्षामुक्ती, मार्मिक, सद्धेतुमलूक व उन्नत मनोरंजक आहे असे सांगून, तसेच ते बिदुस्रावी अर्कसुभाषितासमान क्लृप्तिपूर्ण आहे असे आश्वासून व त्यांचे कौतुकयुक्त व उत्तेजनमिश्रित अभिनंदन करून श्रीज्ञानोबारायांच्या प्रेमळ ‘पसायदाना’ ने ते रसिकांच्या हवाली करतो. (वरील परिच्छेद हा संपूर्ण एका वाक्याचा आहे. हे आचार्य अत्रे यांचे लेखनाचे वैशिष्ट्य.)

— केशव कुमार (झेंडूचीं फुलें)