ले.- रवि बापट-शब्दांकन-सुनीति जैन (वॉर्ड नंबर पाच, केईएम)

मध्ये अशीच काही वर्षं गेली. आमच्याकडे निवासी डॉक्टरांचा संप होता म्हणून आम्ही ज्यष्ठ प्राध्यापक मंडळी इमर्जन्सी ड्यूटी करत होतो. एके दिवशी संध्याकाळी पोलीस अधिकारी व पोलीस यांच्या गराड्यामध्ये स्ट्रेचरवर एक रुग्ण येताना दिसला. आम्ही तातडीची उपचार योजना करायला सरसावलो. पोलीस अधिकारी म्हणाले, ‘‘याला एन्काऊंटरमध्ये गोळ्या लागल्या आहेत. बहुतेक मेल्यातच जमा आहे.’’ डोळे मिटून निपचित पडलेला जन्या डोळे ताडकन उघडून मला पाहताच म्हणाला, ‘‘अरे वा ! बापट साहेब ! वाचलो मी. आता चिता नाही.’’ मेल्यासारखा दिसत असलेला जन्या जागा झाला !

— ले.- रवि बापट-शब्दांकन-सुनीति जैन (वॉर्ड नंबर पाच, केईएम)