सजनाशी मैत्री

नारायण आचार्यांच्या गुरुकुलात ज्ञानसंपादन करण्यासाठी अनेक शिष्य राहात होते. नारायण आचार्य आपल्या शिष्यांवर चांगले संस्कार होतील अशा कथा सांगत असत आणि शिष्यांच्या मनातील ! शंकांचे निरसन व्हावे म्हणून प्रश्नोत्तराचा कार्यक्रम । घेत असत. एकदा असेच सर्व शिष्यांना एकत्र । बोलावून ‘कोणास काही शंका आहेत का? असल्यास विचारा!’ असे त्यांनी आपल्या शिष्यांना आवाहन केले. त्यावर एका शिष्याने ‘ विचारले, ‘ ‘गुरुजी, आपला सच्चा मित्र कृष्णा समजावे?” त्यावर आचार्य म्हणाले, जगात चार प्रकारचे लोक असतात. काही लोक देवाची भक्ती करतात पण त्यांना जो कोणी भेटेल त्यालाही ते देव मानतात: काही लोक देवाची भक्ती करतात पपा त्यांचे लोकांशी व्यवहार चांगले नसतात. काही लोक सतत देवाची भक्ती करतीलच असे नाही पण समाजात राहाताना समाजाबरोबर सद्‌भावनेने वागतात. मात्र काही लोक स्वतः देव मानत नाहीत, त्याला हात जोडीत नाहीत आणि इतरांनाही जोडू देत नाहीत आणि लोकांची पण कदर करीत नाहीत. बघ, समाजात याच चार प्रकारचे लोक दिसतात.
या चार पैकी कोणाला कोणत्या प्रकारात बसवायचे, कोणाशी किती संबंध ठेवायचे, कोणाशी किती संबंध ठेवायचे नाही आणि कोणाला मित्र बनवायचे । हे तुच ठरव!” हे ऐकल्यावर शिष्य या गोष्टीवर ८ विचार करू लागला. आजपर्यंत हे व्यवहारिक ज्ञान – त्याला कोणीच दिले नव्हते. हा जगाचा व्यवहार त्याला नवीन होता. परंतु त्याने या गोष्टीवर बराच विचार केला. मग आचार्यांना म्हणाला, ‘ ‘पहिल्या ‘ प्रकारचा माणूस मैत्री करण्यासारखा आहे. ” त्यावर – आचार्य म्हणाले, ‘ ‘हुशार आहेस. आयुष्यात ‘ अशाच लोकांशी मैत्री कर! जे तुला त्रासदायक ठरणार नाहीत


तात्पर्य : मैत्री ही नेहमी सजनांशीच करावी.