श्री. म. माटे (काखेतील कोंबडा)

‘‘मेला जुनर्या तो जुनर्या ! आन् म्हन्तो कसा, येसाबाई तुमची भागी माज्या जन्याला द्या ! आता बया, तुम्हीच सांगा, असं कुनी केलया का ? पर ह्या मुरदाडाला कळल नवा ना ! जरा हाकुंट तकुंट आला मजी आपला पुना म्हन्तो, माज्या जान्याला तुमची भागी द्या ! आता या काराला काइ करावं ! आमची भागी काय वाटवर पडलीया ? आर तू जुनरी, आन आमची प्वार मांगतुस ?’’ शेजारणी म्हणत, ‘‘लई कसनुस इचारतु ह्यो ! अव, आपून कोन् आन् ह्यो कोन ! त्येला वाटतया आपून बी कारागीर अन् हे बी कारागीर ! पन् बाय, त्यो अन् आपून सारकं कसं वं ?’’ ‘‘कसं बोलला चिमाई तुमी ! माजं खरं का खोटं ? ह्येनं असं येळ तिनदा इचरावं काय वं ?’’ येसाबाई पुन्हा म्हणे. असे संवाद अनेकदा होत. पर त्या भाबड्याला लोभ सुटत नसे. त्याला वाटे की, आपल्या जनुला येसाबाईची भागी मिळावी.

— श्री. म. माटे (काखेतील कोंबडा)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.