वामन चोरघडे (तिची जन्मठेप)

त्या बायकांबरोबर ती पाण्याला जाऊ लागली. एका बाईशी तिने ओळख केली. चौरस्ता लागला. चौरस्त्याच्या मौजा रोजच्या माणसालाच मौजेच्या वाटतात. मग तिला काय ? ती हुरळल्यासारखी झाली. तिला वाटले फिरून आपली जवानी टवटवली. मध्येच जागे झालेल्या माणसाची मुद्रा जशी बावरलेली असते तसे तिने तोंड केले. पिंजर्‍यातून पळालेल्या पाखराला जसे मोकळ्यावरही सुख भोगता येत नाही तद्वत ती चंचलचित्त झाली होती !! रस्त्यावर एक आरसेमहाल दिसला. तिला ते एक मोठे स्वप्न वाटले. माणसाला सुखविण्यासाठी देवाने जशी स्वप्ने निर्माण केली, तसाच हा महालदेखील निर्माण केला असावा, असा तिने कयास बांधला. तिच्या घरी नेहमी ऐकू येणार्या एका इमारतीचे नाव तिला आठवले. तिने शंकेने जवळच्या बाईला विचारले. ‘‘बाई, हा ताजमहाल आहे का ?’’

– वामन चोरघडे (तिची जन्मठेप)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.