वर्षानुवर्षाचा हिशेब ठेवून वागल्यामुळे जगण्यातला आनंद मात्र जातो

एक कंजूस माणूस आपल्या पत्नीला घेऊन बागेत फिरायला जातो. तो दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. कारण त्यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस असतो. कामाच्या व्यापात पंचवीस वर्ष कशी निघून गेली हे कळलेही नाही पण आजचा दिवस लक्षात ठेवून बायको आग्रहाने नवर्याला बागेत फिरायला घेऊन येते.
बागेत बाकावर बसल्यावर नवरा तिला विचारतो,‘‘आणखी एक आईस्क्रीम घ्यायचे का ?’’ या प्रश्नाचे बायकोला आश्चर्य वाटते. ती विचारते, ‘‘आणखी म्हणजे काय ? अजून एकही आईस्क्रीम खाल्ले नाही तर तुम्ही आणखी एक घ्यायचे का असं कसं विचारता ?’’
त्यावर तो कंजूस नवरा उत्तर देतो, ‘‘म्हणजे ? लग्न झालं तेव्हा एकदा आपण असेच बागेत फिरायला आलो होतो त्यावेळेस मी तुला आईस्क्रीम घेऊन दिले होते. आठवतं आहे ना !’’ त्याच्या या वाक्यावर त्याची बायको कपाळाला हात लावते.
तात्पर्य – वर्षानुवर्षाचा हिशेब ठेवून वागल्यामुळे जगण्यातला आनंद मात्र जातो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.