य. गो. जोशी (गोष्ट देता येत नाही ?)

त्यामुळे होई काय-की, मी गोष्ट ल्याहायला बसे, पण टाक हालेना ! मग कुठे टाचणीने दात कोर-टाकाचा दांडाच तोंडात घालून चघळ-नाहीतर गोष्ट लिहिण्याकरता घेतलेल्या वहीवर चित्रेच काढ-नाहीतर लेखक ‘यशवंत गोपाळ जोशी’ या नावाभोवती वेलबुट्टी काढ-असे चाळे करण्यात वेळ जाऊ लागला ! अहो, अखेर, शेवटी कथानक सुचावे म्हणून गेले आठ दिवस सारखा सिनेमाला जात होतो-आर्यन झाला, श्रीकृष्ण झाला-वेष्टएन्ड झाला-पण कथानक सुचेना. अखेर काही इंग्लिश लेखकांच्या गोष्टी वाचल्या पण जमेना ! अखेर ‘अरेबियन’ नाईट वाचले पण ते चालू समाजस्थितीला जुळेना म्हणून त्यातून रुपांतर-भाषांतर करणे जमेना. शेवटी कल्पना सुचण्याकरता भांग घ्यायचे मी ठरविले आहे व त्याकरता मनमोकळेपणाने आपणास हे पत्र आगाऊच लिहीत आहे.

– य. गो. जोशी (गोष्ट देता येत नाही ?)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.