मधाचा उपयोग

पदयात्रा करीत असताना मनोहर पंतांना एका जंगलात एक व्यक्ती भेटली. तिच्या सर्व अंगावर लोखंडी साखळ दंड होते. रस्त्याने चालत जाताना ती व्यक्ती रस्त्यातील प्रत्येक दगड उचलून हातात घेत होती आणि तो दगड अंगावरील साखळदंडाला लावून पाहात होती. त्या व्यक्तीचा हा उद्योग बराच काळपर्यंत सरू होता.मनोहरपंत है सगळं टक लावुन पाहात होते त्यांना त्याच्या या कृतिचा अर्थ त्यांना लागेना. शेवटी न राहून मनोहरपंतांनी त्यांना विचारले, ‘आपण हे काय करीत आहात? काही शोधत आहात का?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘हा दगड लोखंडाला लावून बघण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे, मी गेले बारा-पंधरा वर्षे परीस शोधतो आहे; पण अजून काही मला सापडला नाही. ” हे ऐकून त्या व्यक्तीच्या बुद्धीची किव करत .तो मूर्ख आहे असं समजून मनोहरपत चालू लागले. मधल्या काळात बरीच वर्षे गेली. पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर मनोहरपंतांना ती व्यक्ती भेटली आणि .त्यांना धक्काच बसला. त्या व्यक्तीच्या अंगावरील साखळदंड सोन्याचे होते; पण तरीही त्यांच्या सर्व क्रिया मागील प्रमाणेच सुरू होत्या. मनोहरपंतांनी त्याला विचारले, ‘ ‘अंगावरील
साखळदंड तर सोन्याचे झाले आहे. याचा अर्थ तुम्हाला परीस सापडला आहे. मग आता शोध कशासाठी सुरू?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘ ‘जमिनीवरचा दगड उचलणे, साखळीला लावुन पाहणे आणि टाकून देणे ही क्रिया सतत घडत राहिल्यामुळे परीस हातात आला कधी, तो साखळ्याना लागून त्याचं सोनं झालं कधी आणि नेहमीप्रमाणे मी तो दगड टाकून दिला कधी? हे मला कळलं सुद्धा नाही. आता टाकून दिलेला परीस मी पुन्हा शोधतो आहे. ”

तात्पर्य : परीसासारखी आलेली संधी सोडून दिली तर पुन्हा संधी मिळत नाही.