भीष्मराज बाम (मना सज्जना)

बुद्धीसाठी तेजाची उपासना सर्वांनीच करायची असते. तेजच आपल्याला प्रकाश आणि उष्णता देते. त्याच्यापासून प्रेरणा घेणारी जी बुद्धी असेल, तिलाच सत्य काय आहे ते समजू शकेल व ज्ञानसंपादनाला ती समर्थ होईल. सत्य आणि ज्ञानाशिवाय आपलं जीवन म्हणजे एक पोकळ बुडबुडा मात्र आहे. तसं जगायचं ? शेवटी प्रश्न बुद्धीचा आहे. मी म्हणतो ते पटलं, तरच स्वीकारायचं. दुसरी बाजूसुद्धा पटल्याखेरीज स्वीकारायची नाहीच. योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा तुमच्या बुद्धीला मिळू दे.

— भीष्मराज बाम (मना सज्जना)