बाह्य ज्ञानापेक्षा अंतर्ज्ञान जाणून घेण्यातच विद्वत्ता आहे

दोघं मित्र एका शंकराच्या देवळात दर्शनासाठी आले होते. देवळाच्या गाभार्‍यात एक आंधळा बसला होता. ते पाहून रमेश गोविंदाला म्हणाला, ”त्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला पाहिलंस का ? तो आंधळा आहे. पण गावातील विद्वान पंडित आहे.” रमेशचे म्हणणे गोविदाला पटेना. शेवटी गोविदा त्या आंधळ्याजवळ गेला. त्याला आपली ओळख सांगून गोविंदा त्याच्याशी गप्पा मारू लागला. गप्पा मारता मारता तो जन्मापासून आंधळा आहे हे गोविदाच्या लक्षात आले; पण तो पंडित आहे यावर त्याचा विश्वास बसेना. म्हणून गोविदाने त्याला विचारले, ”या देवळाच्या गाभार्‍यात आपण रोज कशाचं चितन करता ? आपल्या अभ्यासाचा नक्की विषय कोणता आहे ?” यावर तो आंधळा म्हणाला, ”मी खगोलशास्त्रज्ञ आहे.” हे त्याचे उत्तर गोविंदाला पटले नाही. ”तुम्हाला अजिबात दिसत नाही मग तुम्ही ग्रहतार्‍यांचं निरीक्षण कसं करता ?” या त्यांच्या संशयाने विचारलेल्या प्रश्नांवर आंधळ्याने स्वत:च्या छातीवर हात ठेवला आणि म्हणाला, ”अरे, ह्याच्या आतील सर्व ग्रहतार्‍यांचं मी निरीक्षण आणि अभ्यास करत असतो. आता तरी कळलं का ?”
तात्पर्य – बाह्य ज्ञानापेक्षा अंतर्ज्ञान जाणून घेण्यातच विद्वत्ता आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.