प्रभाकर पेंढारकर (रारंग ढांग)

;;खरंच सांगतो, शांततेला आवाज असतो. कधी, कधी, चंद्रप्रकाशात दूरवर, निःस्तब्ध शुभ्रधवल किन्नोर कैलास दिसत असतो. रात्री मी एकटाच, कितीतरी वेळ त्याच्याकडं पाहत बसलो असताना अवचित मला शांततेचा आवाज पहिल्यांदा ऐकायला मिळाला. तुम्ही ऐकलात का कधी ? वीणेची तार छेडल्यावर काही वेळानं तिचा नाद विरून जातो, तरीही कंपन क्षणभर रेंगाळतं. त्या कंपनासारखा ! गाभार्‍यातल्या हुंकाराचे प्रतिध्वनी आपल्याच मनात उमटत राहावेत असा !

— प्रभाकर पेंढारकर (रारंग ढांग)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.