पु. ल. देशपांडे (बटाट्याची चाळ)

ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ, सोकाजी त्रिलोकेकर- ‘‘तुला सांगतो मी पंत, डाएट कर. साला बटाटा सोड ! बटाट्याचं नाव काढू नकोस ! हो ! म्हणजे ‘कुठं राहता ?’ म्हणून विचारलं तर नुसतं ‘चाळीत राहतो’ म्हणा ! ‘बटाट्याची चाळ’ म्हणू नका. वजन वाढेल! खीः खीः खीः !’’ जनोबा रेगे ह्या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय ! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ‘‘ए ईडियट ! साला सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी ? मी सांगतो तुला पंत-तू बटाटा सोड.’’ मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली.

— पु. ल. देशपांडे (बटाट्याची चाळ)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.