दुर्गा भागवत (ऋतुचक्र)

तोच प्रफुल्ल पळसाचे भगव्या फुलांचे तुरे, त्यांच्या त्या करंजीच्या आकाराच्या, तपकिरी मखमली परकर नेसून बसलेल्या सुंदर कळ्या मन ओढून घेतात, उदासीनता घालवतात. ते ताम्हणीचे निळ्या रंगाच्या फुलांचे बहारदार घोस तर काय वर्णावे ? फुलाफुलांची नाजूक मुरडलेली कडा, पाकळीपाकळीचा तो डौलदार नखरा नजर बंदिस्त करून टाकतो. फाल्गुनाची राणीच आहे ही ताम्हण. आणि त्या निर्गंध पांगार्‍याचा भडक लालपणा, त्याच्या फुलांचा तो तरवारीच्या पात्यासारखा आकार तर काय वर्णावा ? त्या थंड ज्योती घोसदार तुर्यातून झाडभर चमकताना पाहिल्या की आशेचे तांबडे मनात फुटते, मन वसंताकडे धावत जाते.

– दुर्गा भागवत (ऋतुचक्र)

1 Comment on दुर्गा भागवत (ऋतुचक्र)

Leave a Reply

Your email address will not be published.