काटकसरी लोक कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढतात

एका गावात एक व्यापारी रहात होता. तो अतिशय कंजूस होता. तो सतत फक्त आपल्या फायद्याचाच विचार करत असे. एकदा तो आजारी पडला. औषधावर खर्च होऊ नये म्हणून त्याने आपला आजार कोणालाच सांगितला नाही. त्यामुळे तब्येत आणखीनच बिघडली. तब्येतीला आराम पडावा म्हणून अनेकांनी दानधर्म करायचा त्याला सल्ला दिला. मग त्याने विचार केला. आपण मरणारच आहोत तेव्हा पत्नीला दान करायला सांगू. तो पत्नीला म्हणाला, ‘‘माझ्या गाडीचा घोडा विकून जे पैसे येतील ते दान कर.’’ ती त्यांचीच पत्नी होती. शेठजींच्या मृत्यूनंतर तिने तो घोडा आणि एक मांजर बाजारात विकायला नेले. नव्याण्णव रुपयाला मांजर घेणार्याला एक रुपयात घोडा विकेन असे तिने सांगितले. एका ग्राहकाने शंभर रूपयात घोडा आणि मांजर विकत घेतले. इकडे शेठजींच्या पत्नीने घोडा विकून मिळालेला एक रुपया दान केला आणि नव्याण्णव रुपये घेऊन घरी गेली. ::
तात्पर्य – काटकसरी लोक कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.