एका गावात एक भुरटा चोर रहात होता. चोरी करणं हाच त्याचा व्यवसाय होता. गावात अनेक ठिकाणी चोर्या केल्यानंतर तो आसपासच्या गावात जाऊन चोर्या करू लागला. अशाच एका गावात आला असताना एका मोठ्या घराच्या बाहेर तबेल्यात एक घोडा बांधलेला त्याला दिसला. त्या भुरट्या चोरासाठी ते गाव नवीन होते; आणि अनोळखी असलेल्या या गावात आपल्याला कुणी ओळखणार नाही या समजुतीने त्याने तबेल्यात जाऊन त्या घोड्याचा दोर सोडून कुणाच्याही नकळत त्याला बाहेर आणले आणि रपेट मारत तो शेजारच्या गावात पोहोचला. गावात बाजार भरला होता. त्या बाजारात घोडा विकून त्याचे पैसे मिळवावे म्हणून घोड्याला घेऊन तो बाजारात उभा राहिला. गिऱ्हाईकं येत होती. घोडा बघून जात होती. कर्मधर्मसंयोगानं त्या घोड्याचा मालकच घोडा खरेदीसाठी तेथे आला. परंतु स्वत:चा घोडा ओळखला आहे हे त्याने अजिबात जाणवू दिले नाही. उलट त्यास घोड्याची किमत विचारून व्यवहार पक्का केला. आणि ”घोडा कसा आहे हे रपेट मारून बघतो आणि तुला पैसे देतो” असं म्हणत तो रपेट मारण्यासाठी निघून गेला. बराच वेळ झाला तरी तो फिरकला नाही. चोराने खूप वाट पाहिली. शेवटी घरी परततांना आजूबाजूच्या व्यापार्यांनी ”घोड्याची किती किमत मिळाली ?” असे विचारल्यावर चोराने उत्तर दिले, ”जेवढ्याला घेतला तेवढ्यालाच दिला.”
तात्पर्य – करावे तसे भरावे.
Very nice
It’s helpful.Thanks to writer
Very nice
Excellent
Thanks writer for such beautiful story with small content
Cool excillent small but very nice
स्टोरी वास टोऊ स्मॉल
Very nice
Nice
The story was boring but quite amazing
Op comp
Story was veryvery nice and helpful for us thanks to writter????
Very nice
THE STORY WAS SMALL BUT VERY INTRESTING
THANKS…….
very good story
Good story
Very good story
VERY NICE
STORY
Nice
Kadak
Very nice
Good story
Thanks for writter for such a beautiful story ?
very bad
Wonderful story thanks to writter
Didi Technic Smyth ENG fan Nancy didi gene didi IDBI which rice house when this
ok nice
useless
Really very good and effective
Siuuuuuuuuuuuuu
excellent this website is wonderfull and extraordinary
VERY GOOD STORY 👍 👏 👌