एक व्यक्ती रस्त्यात काहीतरी शोधत होती. समोरून येणार्या व्यक्तीने विचारले, ”तू काय शोधतो आहेस ?” ”माझी सुई हरवली आहे.” ”कुठे हरवली ?” त्याने विचारले.
”घरातच !”
”घरात अंधार आहे तेथे काही दिसत नाही म्हणून येथे शोधतो.”
पण जर घरात हरवली तर बाहेर कशी सापडणार ? जेथे जे हरवले तेथेच सापडेल ! सामान्य माणसाच्या जीवनातही हरवलेला आनंद तेथेच शोधला पाहिजे ! ::
तात्पर्य – आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा शोध योग्य दिशेनेच झाला पाहिजे.
Leave a Reply