अंगावर आलेलं संकट असेच झटकून टाकले तर त्यावर सहज मात करता येते

एका कुंभाराचे गाढव एकदा एका भल्या मोठ्या खड्ड्यात पडतं. बाहेर येण्यासाठी ते धडपडत असतं. त्याच्या ओरडण्याकडे कुंभाराचे लक्ष जाते पण म्हातारे झालेल्या कुचकामी गाढवाला वाचवून काय उपयोग ? त्याला फुकट खाऊ घालण्यापेक्षा त्याच्यावर माती टाकून त्याला इथेच गाडून टाकू असा स्वार्थी विचार करून एक एक पाटी माती कुंभार गाढवाच्या अंगावर टाकू लागला. काही वेळाने गाढवाचे ओरडणे थांबले. तेव्हा कुंभार खड्ड्यात पाहू लागताच गाढव वर आलेले त्याला दिसले. कुंभार माती टाकीत होता तेव्हा गाढव पाठ हलवून माती खाली झटकत होते व त्यावर उभे रहात होते. जसा मातीचा ढीग होत गेला तसे गाढव वर आले. ::
तात्पर्य – अंगावर आलेलं संकट असेच झटकून टाकले तर त्यावर सहज मात करता येते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.