मराठीसृष्टी वेबपोर्टल आता तब्बल ३० वर्षांचे होतेय… मराठी वाचकांसाठी १९९५ मध्ये सुरु झालेल्या या ३० वर्षांच्या प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी मराठीसृष्टीद्वारे अनेक उपक्रम हातात घेतले आहेत. विविध शहरांमध्ये तसेच ऑनलाईन माध्यमांमध्ये खास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
याच सोबत आमच्या वाचकांसाठी एक खास योजना घेऊन आलोय !
मराठीसृष्टी प्राईम क्लब सभासदत्त्व २०२५ @ रु.१०००/- फक्त
एकूण सुविधा मूल्य – रु.५०००/- पेक्षा जास्त… फक्त रु.१०००/- मध्ये !
या तीस वर्षात आपली मराठीसृष्टी सुमारे पाच लाख मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली. सुमारे ५००० पेक्षा जास्त लेखकांनी मराठीसृष्टीवर लेखन केले आहे. यामध्ये नामवंत लेखक तर आहेतच, पण नवोदितांचेही प्रमाण मोठे आहे. खरंतर शेकडो नवोदितांना मराठीसृष्टीने लेखनाची प्रेरणा दिली.
आपलं ब्रिदवाक्यही असंच आहे… सगळ्यांना प्रेरणा देणारं… तुमच्या आत एक लेखक दडलाय… त्याला जागा करा !
इंटरनेट, वेबसाईट, मोबाईल, गॅजेटस, टॅबलेट, आय-पॅड, या सगळ्या नव्या युगाच्या तंत्रज्ञानात आपली मायबोली मराठी मानाने जगावी यासाठी प्रयत्न करणार्या शेकडो आबाल-वृद्धांचे “मराठीसृष्टी” हे एक हक्काचे व्यासपीठ. “आपण” हे व्यासपीठ उभं केलंय आपल्यासह हजारो – लाखो मराठी बांधवांसाठी.
“आम्ही” आहोत फक्त एक माध्यम. “आपल्या”तल्या लेखकाला जागा करुन, त्याला लिहिण्याची उर्मी देऊन, त्याला लिहितं करणं आणि हे लिखाण हजारो-लाखो मराठीजनांपर्यंत पोहोचवणं आणि यासाठी लागणारं तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणं हे “आमचं” मुख्य काम.
मराठीतून मोठ्या प्रमाणात वेबसाईटस आणि ऑनलाईन मजकूर उपलब्ध न होण्याची कारणे अनेक आहेत, मात्र ती काहीही असोत…… असा मराठी मजकूर मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर उपलब्ध होणे ही खरी गरज आहे. ऑनलाईन लिखाणासाठी मराठी माणसाला उद्युक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याला सोप्या पद्धतीने मराठीतून लिखाण करुन ते प्रकाशित करुन देण्याची सोयही उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्याही पुढे जाऊन या लेखनाला वाचकवर्ग मिळणेही महत्त्वाचे आहे. मिळालेला वाचकवर्ग टिकविण्यासाठी सततचे लिखाण आवश्यक आहे. कामधंदे सोडून हे सगळे उद्योग करायचे म्हटल्यावर स्फूर्ती मिळण्यासाठी या उद्योगांतून थोडेफार उत्पन्नही मिळणे गरजेचे आहे.
मराठीच काय पण भारतातल्या बहुतांश भाषांसाठी हे एक दुष्टचक्र आहे. मजकूर नाही म्हणून वाचक नाहीत. वाचक नाहीत त्यामुळे लिहिण्याची स्फूर्ती येत नाही. वाचक नाहीत म्हणून वेबसाईटला जाहिराती नाहीत आणि त्यामुळे उत्पन्न नाही. पैसे खर्चच करायचे आणि उत्पन्न काही नाही म्हणून पुन्हा लिहिण्याची स्फूर्ती नाही. हे कुठेतरी बंद व्हायला हवे.
इंग्रजीत लाखोंनी वेबसाईटस आहेत आणि त्यांचा वाचकवर्गही आहे. अक्षरश: एकेका विषयावर अनेक वेबसाईटस आहेत. ज्याअर्थी एवढ्या मोठ्या संख्येने वेबसाईटस असूनही त्या नियमितपणे चालविल्या जातात त्याअर्थी तिथे आर्थिक गणितेही पक्की असणार. त्या वेबसाईटसना उत्पन्नही असणार. तशीच परिस्थिती मराठीतही निर्माण व्हावी यासाठी मराठीसृष्टीने पुढाकार घेतला आहे. कठीण तंत्रज्ञान सोपे करुन, कमीतकमी खर्चात उपलब्ध करुन देऊन मराठीमध्ये जास्तीत जास्त वेबसाईटस तयार व्हाव्या तसेच जास्तीत जास्त लोकांनी मराठीतून ऑनलाईन लिखाण करुन इंटरनेटवरचा मराठी टक्का वाढवावा अशी मराठीसृष्टीची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठीच जवळजवळ २५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम हे व्यासपीठ उभे केले गेले.
मराठीसृष्टी ही केवळ आमची एक वेबसाईट नाही. हे एक सर्वसमावेशक “पोर्टल” आहे. हे पोर्टल आहे तुमचं…. आमचं…. सर्वांचं! मराठीतलं काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं… जे आपल्याला मराठी मंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे.
निनाद अरविंद प्रधान
संस्थापक आणि व्यवस्थापकीय संपादक
मराठीसृष्टी डॉट कॉम
