जरी शेतात फार थंडी

जरी शेतात फार थंडी बा-कडं मागु नका नवी बंडी बा-चं कुडतं पुरतं विरलं आय तर नेसते ठिगळं-ठिगळं – सुभाष नाईक 

लोकहो, हा कृषक आहे

लोकहो, हा कृषक आहे ऍग्रिकल्चरची सर्वश्रेष्ठ कडी ! भलेही, कर्जामुळे-व्याजामुळे वळू दे त्याची बोबडी ! – सुभाष नाईक 

हात हलवला दुरून पाहुन

हात हलवला दुरून पाहुन वरून दृष्टी फिरवियली हेलिकॉप्टरनें, ट्रीप पुराची लीडरजींना पुरवियली. – सुभाष नाईक 

जलमय झाला परिसर सगळा

जलमय झाला परिसर सगळा आभाळातुन पूर दिसे विमानातुनी, नेताजींना पूरग्रस्तांचा नूर दिसे. – सुभाष नाईक 

आले कां पत्रकार कोणी ?

आले कां पत्रकार कोणी ? आले कां रे कॅमेरे ? शेतकर्‍याचे पुसतो आंसू झटपट घ्या व्हीडिओ ‘खरे’. – सुभाष नाईक 

नेतेगणहो, तुम्ही ठेवा

नेतेगणहो, तुम्ही ठेवा तुमच्या स्कीम्या तुम्हांनजिक शेतकर्‍याला, तुमची ‘सेवा’ तापदायकच ठरे खचित. – सुभाष नाईक 

1 2 3