J-028

“माझा सुरेश अगदी लवकर उठून अभ्यासाला बसतो.” सुरेशची आई कौतुकाने गण्याच्या आईला सांगत होती. “आमचा गण्याही खिडकीतून सूर्याची तिरपी किरणे आत येताच तत्काळ उठतो बरं का!” गण्याच्या आईने ही जरा फणकारतच सांगितले. “हो, पण तुमच्या गण्याच्या खोलीची खिडकी तर पश्चिमेला आहे ना ?”