नंदिनी आत्मसिद्ध (मिरलचं मुत्ति*स्वप्न)

सुरुवातीला कैरो विद्यापीठात आणि शहरातल्या एकूण वातावरणात मिरलला तसं बुजल्यासारखं व्हायचं. तिचे कपडे, तसे जुन्या पठडीतले होते. सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं हे तिला नीट समजत नसे. पुरुषांशी बोलताना तर खूप संकोच वाटायचा. शहरात स्त्रीपुरुष ज्या मोकळेपणाने वागत ते पाहून तिला अस्वस्थताच यायची. स्वतःबद्दलही तिला न्यूनगंड होता. तिच्या आईमुळेच तो निर्माण झाला होता. ‘तू सुंदर नाहीस’ असं तिच्या मनावरच बिंबवण्यात आलं होतं. केव्हातरी, ‘उभरती तरुण आणि सुंदर लेखिका’ म्हणून तिची ओळख एका पत्रकाराला करून दिली तेव्हा तिला स्वतःला धक्काच बसला होता.

– नंदिनी आत्मसिद्ध (मिरलचं मुत्ति*स्वप्न)