विजया राजाध्यक्ष (विदेही)

नुक्तीच दिवेलागण झाली होती. सगळे उदास भासत होते. आभाळात काही तटस्थ नक्षत्रे, एका विचित्र रंगाचा बेडौल ढग, फिक्या अंधाराने माखलेली क्षितिजाची रेषा, दूरात पाण्याचा भास, रस्त्यावर चुळबुळणारी वाहने आणि माणसे, एखादे संकोचलेले, हळुवार झाड. सूक्ष्म सळसळ, मुकाट वाहणारा वारा. कुठेकुठे प्रकाशाची टिंबे. सगळे चिंतनमग्न, एकमेकांपासून विलग. वातावरणाच्या ओटीपोटात दडलेला कोवळ्या रात्रीचा हुंकार.

— विजया राजाध्यक्ष (विदेही)