व्यवहारज्ञान महत्त्वाचं

एक दिवस नेहमीप्रमाणे एक प्रसिद्ध उद्योगपती आपले आरोग्य चांगले राहावे म्हणू समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आले होते. त्या किनाऱ्यावर आसपास अनेक माणसं फिरायला आली होती.

एक जण त्या उद्योगपतींकडे पाहून म्हणाला, “अरे, हा एव्हढा मोठा उद्योगपती. साधी मॅट्रिकची परीक्षा सुद्धा पास झालेला नाही. मग त्याच्याजवळ कसली आली आहे बुद्धीमत्ता !”

हे ऐकल्यावर ते उद्योगपती त्या माणसाजवळ गेले आणि म्हणाले, “तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. मला तुमचा नाव, पत्ता हवा आहे.” त्यांचं हे वाक्य पूर्ण होताच त्याने खिशातून आपलं नाव, पत्याचं कार्ड ऐटीत काढून दिलं.

पंधरा दिवसांनी त्या माणसाच्या घरी अब्रूनुकसानीची नोटीस उद्योगपतीने पाठविली. पुढे खटला उभा राहिला. उद्योगपतीने अनेक विषयांच्या तज्ज्ञ लोकांना प्रश्न विचारला. पण काही प्रश्नांची उत्तरं त्या तज्ज्ञ लोकांनाही देता आली उद्योगपतींना नाही.

त्यानंतर त्या सर्व बुद्धिवंतांनी उद्योगपतीला प्रश्न विचारले. संगणकाच्या मदतीने उद्योगपतींनी सर्व प्रश्नांची सहजपणे उत्तरं दिली. आणि न्यायाधिशांना विचारले… “मिलॉर्ड, कोणती गोष्ट केव्हा कशी आणि कुठे वापरायची याचे अचूक ज्ञान माझ्याजवळ. त्यायोगेच मी हे मोठमोठे कारखाने चालवतो आहे. तेव्हा मी बुद्धिमान नाही हे म्हणणं योग्य आहे का?”

या त्याच्या सफाईमुळे निकाल उद्योगपतींच्या बाजूने लागला.

तात्पर्य : जगात वावरताना व्यवहारज्ञानच महत्त्वाच ठरतं !