वि. मा. दी. पटवर्धन

कॉलेजच्या प्रांगणात पाऊल ठेवल्यानंतर मला जे काव्याचे पंख फुटले आणि प्रतिभेचे उमाळे (!) आले ते काही व्यक्तीI पाहूनच, उदाहरणार्थ, आमच्या वर्गातली यशवंती गुप्ते. मोठी खेळकर न हसतमुख. वर्गात प्रोफेसर रागावले, स्टँपिग झालं तरी ही आपली खळखळून हसायची. तिचे चमकदार डोळेही जणू काय तिच्याबरोबर हसू लागायचे. तिच्यावर मी ‘आनंद कंद ऐसा’ या चालीवर ‘क्लासी सदा हसावे, मग एवढेच ठावे । वलयांसि वाजवावे । नाकास खाजवावे, पदरास चाळवावे, खुदकन पुन्हा हसावे ! मज एवढेच ठावे…’ अशी एक माझ्या मतानं झकास (!) कविता रचली होती. माझ्या काही द्वाड मित्रांनी तिच्यातील एकेक ओळ रंगीत खडूनं रोज फळ्यावर, ‘सर’ येण्यापूर्वी लिहून ठेवण्याचा रंगेल उद्योग चालविला होता.

— वि. मा. दी. पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.