1691

वृद्ध लोकांना एक सवय असते. ‘सगळं बदललं. आमच्या वेळचं काही आता काही राहिलं नाही !’ असं म्हणून हळहळण्याची. जुन्या काळाचं कौतुक करण्याची. एकदा एक म्हाताऱया आजी तक्रार करीत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘हल्ली काय आरसे निघालेत गं बाई ! ‘ज्यात बघावं त्यात सुरकुतलेलं तोंड दिसतं. अगदी बघवत नाही. आमच्यावेळी पूर्वी काय सुंदर आरसे असायचे ! इतकं छान दिसायचं म्हणता ! आरशाची क्वालिटी पूर्वीसारखी राहिलीच नाही.’