1677

कडक शिस्तीच्या जोशी सरांनी ज्योतिष मित्राच्या सांगण्यावरून एकदाचे लॉटरीचे तिकीट काढले. पूर्वेकडे तोंडकरून उजव्या हाताने डाव्या कोपऱयातील खालून तिसरे तिकीट त्यांनी डोळे मिटून घेतले आणि चक्क त्यांना पाच लाखाचे बक्षीस लागले. ते तिकीट घेऊन ते धावतच लॉटरी विक्रेत्याकडे गेले. मला माझ्या बक्षिसाची रक्कम द्या. असे म्हणताच लॉटरी विक्रेता म्हणाला, “सर आज नाही उद्या मिळतील.”

त्यावर सर रागावूनच म्हणाले, “हे पहा, मला आजच पैसे पाहिजेत. तुम्ही पैसे देणार नसाल तर माझ्या तिकीटाचे पाच रुपये परत करा !”