सरोजिनी महिषी, (प्रस्तावना – अपराजिता रमा)

नवरसांचा आविर्भाव पंडिता रमाबाईंच्या जीवनचित्रात आलेला पाहावयास मिळतो, रमाबाईंचे जीवनच असे होते की, त्याच्या मुळातच करुणा होती. भवभूतीच्या सांगण्याप्रमाणे ‘एको रसः करुण एव’ या उक्तीवर आपला विश्वास असेल तर रमाबाईंच्या जीवनात करुण रसापासूनच बाकीच्या गोष्टी उद्भवल्या. बाळपणीच तिच्या मनावर करुणरसाचा ठसा उमटला. वडिलांनी तिला बोलावून, ‘‘बाळे मी तुला देवाच्या स्वाधीन करून जात आहे तोच तुझे रक्षण करील. त्याचीच तुझ्यावर सत्ता आहे आणि त्याचीच तू नित्य सेवा केली पाहिजेस,’’ असे सांगितलेले ऐकून कोणाचे हृदय ओलावणार नाही ?

— सरोजिनी महिषी, (प्रस्तावना – अपराजिता रमा)