मीना प्रभु (तुर्कनामा)

ट्रॅम म्युझिअमपाशी संपत होती. समोर त्याची इमारत. सुरेख बागेत त्याहून सुरेखशी लाल दगडाची इमारत. बाहेरून बघून भारी खूष व्हावं. पण तिथलं तिकीटही भारी. आतली मांडणी कलापूर्ण, विषयवारीनं केलेली आणि काळानुसार मांडलेली. आता तुर्कनं चालू केलेल्या या म्युझिअम संस्थेनं आता चांगला जोम धरला आहे. त्याला उत्तम शिस्त आहे आणि कितीही सारखेपणा असला तरी दरेक म्युझिअममध्ये काहीतरी नवं सापडतंच. पूर्वप्राचीन अश्मयुग, लोहयुग कालापासून आजच्या स्थानिक कला-कापड्यांपर्यंत सगळ्यांना तिथं जागा होती.

– मीना प्रभु (तुर्कनामा)