फादर फ्रान्सिस दिब्रिटो (रहाटमाळ)

जे मिळाले आहे ते सगळे दान आहे ही भूमिका म्हणजे देतानाही किती कृतार्त वाटते !…. मोकळ्या मनाने सर्वस्व द्यावेसे वाटते. अशाप्रकारे जे दिले जाते त्याचे तीर्थ होते. जगात सर्वात सुंदर काय असेल तर ते दान करून रित्त* झालेले कर्णाचे कृतार्थ हात ! रवींद्रनाथ टागोरांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली होती – ‘माझी इहलोकीची यात्रा संपली की तुझ्याकडे येईन. अपेक्षापूर्ण अंतःकरणाने आणि रिकाम्या हातांनी !’ जे जमविले आहे, जे कमावलं आहे त्याचे तीर्थ वाटून, एक दिवस तुम्हाला आणि मला रिकाम्या हाताने परंतु कृतार्थ मनाने या जगातून निघून जायचे आहे !

— फादर फ्रान्सिस दिब्रिटो (रहाटमाळ)