प्राचार्य म. द. हातकणंगलेकर. (घड्याळ नसलेल्या घरात बापू)

नंतर मी अनेक वेळा बापूंच्या घरी गेलो असेन. त्यांच्या कौटुंबिक समारंभातही सामील झालो होतो. मला असे आढळले, की बापू हे खर्‍या अर्थाने या मोठ्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. इंग्रजीत ज्याला “पॅट्रीआर्क” म्हणतात, तसे आहेत. त्यांचे कुटुंब एक क्लॅन आहे. त्यांच्या पत्नी आत पाऊल न वाजवता वावरत असतात आणि सार्या कुटुंबाला माया पुरवित असतात. किती माणसे, जवळची, दूरची येत असतात, जात असतात, खात, जेवत असतात. शेताकडे, दुकानाकडे जात-येत असतात. घरात सामानसुमान आणून टाकत असतात. सारे व्यवहार शांत, समंजसपणे चालेले असतात. बापूंचे लक्ष असते, पण ते व्यवहारात गुंतलेले नसतात. आवश्यक वाटेल तेव्हा सल्ला देत असतात.

— प्राचार्य म. द. हातकणंगलेकर. (घड्याळ नसलेल्या घरात बापू)