नरहर कुरुंदकर (साहित्य : समीक्षा)

मी स्वतः कलांचा उगम या प्रश्नाकडे एका विशिष्ट दृष्टीने पाहतो. कलांचा उगम म्हणजे माध्यम आणि साधनसाहित्य यांचा उगम नव्हे. या माध्यमाचा आकर्षण रक्षणासाठी जो वापर होतो त्याचा उगम नव्हे. कारण कलांची प्रकृती म्हणजे रंग, रेषा, आकार, शब्द आणि स्वर नव्हे तर या सार्यांमधून जे अनुभवांचे निवेदन होत असते त्या निवेदनाशी कलांचे उगम जोडलेले आहेत. कलात्मक व्यापारात निवेदनलौकिक गरजांशी जोडलेले नसेल. हे निवेदन माहितीचे नसेल. कलांच्यामध्ये असणारे निवेदन भावनिक पातळीवर आणि एकात्म असेल, त्याला महत्त्व सांस्कृतिक असेल. हे सगळे मान्य केले तरी एक मुद्दा शिल्लक राहातो. तो म्हणजे कलात्मक व्यापार हा सांकेतिक निवेदनाचा व्यापार आहे. या व्यापारात माध्यमाला म्हणून महत्त्व नसते तर इच्छित अर्थ अभिव्यक्तीगचे साधन म्हणून महत्त्व असते.

– नरहर कुरुंदकर (साहित्य : समीक्षा)