गाय द मोपासा (चंद्रिका)

ब्रह्मचर्याची शपथ घेतलेल्या जोगिणी त्याला निरुपद्रवी वाटत, व त्यांच्याशीच काय ते तो बोले चाले. परंतु ते देखील काहीशा तिरसटपणानंच. कारण व्रतपालनामुळं नम्र आणि बद्ध झालेल्या त्यांच्या अंतःकरणातदेखील खोल कुठंतरी प्रणयाची भावना अजूनही शिल्लक होती, व जरी तो धर्मोपदेशक होता तरी त्या प्रेमाचा रोख त्याच्यावर होता अशी त्याची कल्पना होती. त्या प्रेमाचा पुरावा त्याला कितीतरी गोष्टीत सापडले. त्या जोगिणींच्या तरळत्या नजरेत, त्यांच्या भावनाविवशतेत, भक्तीच्या उद्रेकांत ! त्या जोगिणींची नम्रता, त्यांचे मृदु मधुर आवाज, खाली पाहणारे त्यांचे डोळे, रागं भरलं की त्यांच्या गालावरून वाहणारी आसवं , या सार्या गोष्टीत त्याला प्रणयाच्या दुर्बलतेचाच खेळ दिसे, व त्यांचा त्याला वीट येई.

— गाय द मोपासा (चंद्रिका)