अरविद वि. गोखले (सात समुद्र)

पण दैव तिला अनुकूल नव्हते. तिच्यावर संकटपरंपरा कोसळायची होती जणू ! म्हणूनच की काय, तिला शिक्षण संपल्याबद्दल आनंद वाटला नाही. वडिलांना तिचे ताबडतोब लग्न जमविता आले नाही. त्याबद्दलचा आनंदही तिला अपुरा वाटला. दिवसेंदिवस तिला एकलकोंडे वाटू लागले. तशात युद्ध सुरू झाले. कृष्णाकाठच्या एका छोट्याशा गावात रहाणारी मंजुळा ! पण पश्चिम युरोपात सुरू झालेल्या युद्धाने तिच्या हृदयाचा थरकाप उडाला ! तिला जीवन असह्य वाटू लागले. जणू युद्धाची धुमश्चक्री तिच्याभोवतीच चालली होती. अन् त्यातील शस्त्रास्त्रे तिच्या हृदयाच्या चिधड्या उडवीत होती.

अरविद वि. गोखले (सात समुद्र)