अभय बंग (माझा साक्षात्कारी हृदयरोग)

कधी इतरांसोबत मिठाई किवा आईस्क्रीम खाण्याचा प्रसंग आलाच किवा स्वतःलाच तीव्र इच्छा झाल्यास काय कराव ? ऑर्निशने एक युक्ती सुचवली आहे. आवडता पदार्थ उदा. श्रीखंड, एक चमचा भरून घ्यावा. प्रथम त्याच्याकडे डोळे भरून पाहावं. रंग पाहावा, रूप पाहावं, गंध अनुभवावा. मग फक्त एक चमचा तोंडात घेऊन बराच वेळ तसाच तोंडात राहू द्यावा. हळूहळू विरघळू द्यावा. एक चमच्यावरच थांबावं. आवडती वस्तू खातांना खरं म्हणजे पहिला घास व शेवटचा घास हेच पूर्ण चवीने खाल्ले जातात. मधला भाग नुसता गिळला जात असतो. त्यामुळे दोन चमचे श्रीखंडातूनही पोटभर श्रीखंड खाण्याचा आनंद मिळवता येतो.
– अभय बंग (माझा साक्षात्कारी हृदयरोग)